पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम सर्व कर रद्द करून बँक व्यवहारांवर २ टक्के कर आकारायला हवा होता. मात्र त्यांनी भोवतालच्या काही सल्लागारांमुळे प्रथम मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय योग्य, तरी चुकीच्या मार्गाने घेतला. हा निर्णय म्हणजे भूल न देता रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासारखा आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी रविवारी येथे केले.अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या विनम्र आग्रह उपक्रमाचा समारोप शनिवारवाड्याच्या पटांगणावर झाला. त्या वेळी बोकील बोलत होते. प्रतिष्ठानचे कल्याण वर्दे, सुधीर राव, करणवीर सिंग आदी व्यासपीठावर होते. प्रतिष्ठानच्या पाच कलमी प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय आयोग नेमावा, या मागणीसाठी गेले तीन दिवस आग्रह उपक्रम सुरू होता.करणवीर सिंग, अभिजित धर्माधिकारी, यमाजी मालकर, आशुतोष फाळके, जयप्रकाश मिश्रा, अशोक तुळपुळे, अर्चना मुळे, अरुण फुके आदींनी मनोगत व्यक्त केले.
नोटाबंदी म्हणजे भुलीविना शस्त्रक्रिया
By admin | Published: November 14, 2016 6:57 AM