शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झालेली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपलं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याचं म्हणत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना ठाकरे आणि शिवसेना असं नाव न वापरता जगून दाखवा असा इशाराही उद्धव ठाकरे म्हणाले. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. कुटुंबप्रमुखाला धोका देताय याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं नया, फांद्या न्या पण तुम्ही मूळ नेऊ शकत नाही. हे सर्व भाजपनं केलं असून त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असले तर खुशाल जा पण बंडखोर आमदारांसाठी काय कमी केलं असा सवालही त्यांनी केलं.
जिद्द सोडलेली नाही"मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे", अशी सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी आता थेट मैदानात उतरुन बंडखोरांना इशारा दिला आहे. "महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा...आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.