शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

वाद टाळण्यासाठी नको पुतळे वा झेंडे !

By admin | Published: August 23, 2016 5:45 AM

गावात जातीयतेला थारा नाही’ असा फलक असलेल्या अंबुलगा गावातील नागरिकांनी सोमवारी आणखी एक आदर्श घालून दिला

माधव पिटले,

अंबुलगा (जि. लातूर)- गावच्या वेशीवरच ‘या गावात जातीयतेला थारा नाही’ असा फलक असलेल्या अंबुलगा गावातील नागरिकांनी सोमवारी आणखी एक आदर्श घालून दिला. वाद टाळण्यासाठी गावात ना कुठला पुतळा, ना कुठला झेंडा, असा ठरावच या ग्रामस्थांनी घेतला. निलंगा तालुक्यातील अंबुलगा हे दहा हजार लोकवस्तीचे गाव. १९६५पासून गावाला १३ सदस्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचक्रोशीत आर्यसमाजी गाव म्हणून अंबुलग्याची ख्याती आहे. गावात कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसविलेला नाही. महापुरुषांची जयंती आली की अनुयायी चौका-चौकात झेंडे लावायचे. परंतु सोमवारी झालेल्या ग्रामसभेनंतर त्यालाही बंदी घालण्यात आली आहे. पाचशेहून अधिक लोक या ग्रामसभेला हजर होते. विकासाच्या नावाखाली पुतळे उभारण्याचे प्रकार घडू नयेत. सहा महिन्यांपूर्वी गावात झेंडा लावण्यावरून तणाव निर्माण झाला होता. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.>जातीपातीच्या नावावर चौक कशाला?गावात यापूर्वी विविध चौकांच्या नामकरणाची मागणी पुढे आली होती. परंतु सोमवारच्या सभेत गावातील ज्येष्ठांनी आपले गाव आर्यसमाजी आहे, आपल्या गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, त्यामुळे जाती-पातीच्या नावावर चौक वाटून घेऊन गावात वाद येऊ नये यासाठी हा ठराव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. याला सर्वांनीच एकमुखी पाठिंबा दिला.गावात सामाजिक शांतता व सर्वधर्मसमभाव वाढीस लागावा, यासाठी काही उपाययोजना करायला हवी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गावात यापुढे कुठल्याही महापुरुषाचा पुतळा उभारू दिला जाणार नाही; तसेच एकही ध्वज लावू दिला जाणार नाही, असा ठराव ग्रामसेवक आर. डी. वाघमारे यांनी मांडला होता.