शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

भाजपाचा नव्हे; साम, दाम, दंड, भेदाचा विजय : चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:24 AM

धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपाचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : राज्यपातळीवर भारतीय जनता पार्टीने गेली चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नैतिकता बासनात गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया कायम ठेवली आहे. दुमार्गाने मिळवलेले धन म्हणजे दुर्योधन आणि अनैतिक पद्धतीने चालवलेले शासनम्हणजेच दु:शासन याच्या माध्यमातून लोकशाहीचे वस्त्रहरण सातत्याने केले जात आहे. धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपाचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.खा. चव्हाण म्हणाले, पालघर लोकसभा निवडणुकीत स्वमुखातूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपाची रणनिती स्पष्ट केलेली आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधिकृतपणे लक्ष्मी दर्शनास मान्यता दिलेली आहे. गुंडाना पक्ष प्रवेश, इतर पक्षातील लोकांना अमिषे दाखवून, भीती दाखवून फोडणे, पैशांचा खुलेआम वापर आणि निवडणूक यंत्रणेला धाब्यावर बसवणे. या सर्व गैर प्रकारातूनच विजयाचा फॉर्म्युला भाजपाने तयार केला आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रात काँग्रेस प्रमुख पक्ष नाही.या दोन्ही शहरातील विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षापासून आघाडीतील मित्र पक्षांसाठी सोडलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे, असे असले तरीही काँग्रेस उमेदवार व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धनशक्तीचा निकराने विरोध केला आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या या कौरवनीतीचा पाडाव जनताच करेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा