पुणे : राज्यातील इतिहास असलेल्या एकाही किल्ल्याला नखमयही धक्का लागू देणार नाही. हा जो पर्यटन मंत्रालयाचा निर्णय झाला तो ज्या किल्ल्यांना इतिहास नाही त्यांच्या संदर्भात आहे. परंतु, या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात आहे , गड किल्ल्यांसंदर्भातील सरकारच्या निर्णयासंबधी उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टोक्ती दिली. पर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असून तिथे समारंभांना देखील परवानगी दिली जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले . विरोधकांनी देखील त्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर सरकारक़डून या निर्णयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्र्याचा गणेश मंडळांच्या भेटीसाठीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी गडकिल्ल्यांविषयीच्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, संभाजीराजांचे मी अभिनंदन करतो त्यांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचे चांगले.काम केले आहे. मात्र, समाजात पर्यटन मंत्रालयाच्या निर्णयावर अफवा पसरविण्यात येत आहे. इतिहास असलेल्या कोणत्याही किल्ल्यांना काहीही धक्का लागणार नाही यावर आमचे लक्ष राहील.छत्रपतींचा, आमच्या मराठ्यांचा इतिहास जिथेजिथे आहे त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी कधीच दिली जाणार नाही. जिथे फक्त चार भिंती राहिल्यात, कसला इतिहास.नाही तिथे पर्यटनाच्या दृष्टया काही करता येईल असा हा निर्णय आहे. तिथेही लग्न लावणार किंवा कार्यक्रम होणार असे नाही.
इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 7:54 PM
छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास जिथे जिथे आहे. त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी सरकार कधीच देणार नाही.
ठळक मुद्देपर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा