मुंबई : राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्यासारखी कुठलेही कारण सध्या दिसत नाही. तसा प्रयत्न झालाच तर तो यशस्वी होणार नाही असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ पदाधिकाºयांची थोरात यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या घटनात्मक पेचावर कायदेशीर लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेस पक्षाची एक लिगल टीम दिल्लीहून आलेली होती. आता पुन्हा ही टीम मुंबईत आली असून घटनात्मक पेचप्रसंगातून सरकार कसे सुखरुप बाहेर पडता येईल यासाठी योगदान देत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. बंडखोर आमदार आणि मंत्र्यांबाबत काय निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री ठरवतील.
राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती नाही : थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 1:53 PM