शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 12:33 AM

कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे...

मला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे. पराभूत होणारा पक्ष ईव्हीएमला दोषी ठरवतो. मात्र हा जनतेचा जनादेश आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे. याच वेळी त्यांनी पंतप्रधानांच्या कामकाजाचीही प्रशंसा केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामनामध्ये इव्हीएमच्या बाबतीत बातमी देण्यात आली आहे की, बांगलादेशमध्ये पुन्हा बॅलेटवर शिफ्ट होण्याचा निर्मय झाला आहे. आपल्याला असं वाटतं का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, "माझा वैयक्तिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार नसते."

पवार म्हणाले, "ईव्हीएममध्ये फेरफार करणे एका व्यक्तीला शक्य नाही कारण ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध झाले, तर संपूर्ण देशात पेटून उठेल. यामुळे, असे करण्याचे धाडस कुणी करेल असे मला तरी वाटत नाही. कधी-कधी काही लोक निवडणूक हरतात, पण आपण हरूच शकत नाही, असे त्यांना वाटते आणि मग ते ईव्हीएमला दोष देऊ लागतात आणि त्यातून सुटका करून घेतात, पण हाच खरा जनतेचा जनादेश आहे."  

पंतप्रधानांच्या डिग्रीवर काय म्हणाले पवार? - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीसंदर्भात आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर विचारले असता अजित पवार म्हणाले, एके काळी केवळ दोन खासदार असलेल्या पक्षाने 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आणि तो सर्वदूरपर्यंत पोहोचला हा मोदींचा करिष्मा आहे की नाही? त्यांच्या विरोधात विविध प्रकारची वक्तव्ये केली जातात. पण ते आणखी लोकप्रिय झाले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत निवडणुका जिंकल्या. आता 9 वर्षांनंतर हे मुद्दे काढून काय उपयोग? त्यांचे कामकाज जनतेने पाहिले आहे आणि राजकीय क्षेत्रात शिक्षणाचा मुद्दा हा तसे पाहिले तर गौन समजला जातो. 

कारण आम्ही पाहिले आहे की या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री झालेले वसंत दादा पाटील यांचेही शिक्षण अतिशय कमी झालेले होते. तरीही अत्यंत उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार म्हणून त्यांची ओळख भारताला होती. त्याच प्रमाणे आपल्या राज्यालाही आहे. त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही. उलट त्यंच्याच कारकिर्दित सर्वात जास्त महाविद्यालये महाविद्यालये उघडण्यात आली. म्हणूनच राजकारणात शिक्षित असण्याची अट नाही. त्यामुळे या प्रकरणी माझी भूमिका स्पष्ट आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना