ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. २२ - आपल्याक डे केवळ पैठणी साडी प्रसिद्ध आहे. तसेच ती अनेक महिलांची आवड आणि पहिली पसंती ठरलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही अनेक प्रकारचे केक पाहिले असतील. केकच्या नामावलीत आता पैठणी केकने आपले स्थान मिळवले आहे. डोंबिवलीतील कलाकार नेहमीच काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. तोच प्रयत्न डोंबिवलीतील तरुणी तृप्ती पावले हिने पैठणी केक तयार करुन सगळयांकडूनच दाद मिळविली आहे. त्याच्या पैठणी केकची चर्चा सगळीकडे सुरु आहे. इतकेच नव्हे तर तिने तयार केलेला पैठणी केक सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.
शहरातील पश्चिम भागातील भोईरवाडीत राहणारी तृप्ती पावले या तरूणीने क्रि एटीव्ह कॉन्फेक्शनरी मार्फत पैठणी केक बनविला आहे. विशेष म्हणजे हा केक पूर्णपणे शाकाहारी आणि खाण्यायोग्य आहे. गेल्या ४ वर्षा पासून तृप्ती ही विविध केक बनवून त्यावर आकर्षक कलाकुसरी करत आहे. क्रि एटीव्ह कॉन्फेक्शनरीच्या मार्फत बेकिंग-कूकिंगचे ५७ क्लास भारतात व ईस्ट आशियामध्ये घेण्यात येतात असे तृप्ती पावले हिने सांगितले. पावलेच्या परिचीत व्यक्तीनी त्याचाकडे एक आगळा-वेगळा केक बनविण्याची आॅफर दिली.
त्यानुसार पैठणीची कलाकुसर असलेला केक तयार करण्याचे मनात ठाणले. अंडे न वापरता दीड किलो वजनाचा बनविलेला हा केक सर्वांना खूप आवडला. या केकवरील प्रतिकात्मक दिसणारे हुबेहूब दागिने देखील खाण्याचा मोह खवय्याला न आवारता येण्यासारखा असतो. त्यामुळेच ते दागिने सुद्धा इटेबल असल्याचे पावले हिने नमूद केले. या केकचे सोशल मिडीयावर देखील कौतुक होत असल्याचे तृप्तीने सांगितले.