शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Maharashtra Corona Update: राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र...; राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 7:11 AM

Rajesh Tope on Omicron, corona Patients: महाराष्ट्रात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण सापडले. एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनावर गेली तरच लॉकडाऊन होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येेथे सांगितले. 

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९,१७० नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजारांहून अधिक आहे.  ओमायक्राॅनबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या रूग्णांची तब्येत गंभीर नाही. डेल्टामुळे रुग्णांची तब्येत बिघडते आणि ऑक्सिजन लागतो, मृत्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओमायक्राॅन व डेल्टाचे प्रमाण कळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कुणीही घाबरून जाऊ नये, असे म्हणाले. परवा ५ हजार रुग्ण होते. काल साडेआठ हजार झाले.

प्रत्येक विभागात जिनोम सिक्वेन्सिंगn प्रत्येक विभागात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. n एस जीन किट आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणार आहे. n ओमायक्राॅनची रुग्ण तपासणी खासगी प्रयोगशाळेतही करता येईल. मात्र त्यासाठी शुल्क मर्यादा असेल.

२२ हजार नवे रुग्णदेशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. आदल्या दिवसापेक्षा ही वाढ ३५ टक्के आहे. या काळात सक्रिय रुग्णांचा आकडा १३ हजारांनी वाढला असून ती संख्या एक लाखांवर गेली आहे. 

१४३१ ओमायक्रॉनबाधितओमायक्रॉनबाधितांची संख्या १४३१ वर पोहोचली असून त्यातील ३७४ जण बरे झाले. अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, केरळचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे