मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना अधिक जागा मिळवून क्रमांक १चा पक्ष राहिला असतानाच भाजपाने सेनेला तोडीस तोड उत्तर दिले आहे. काही मतांच्या फरकाने भाजपाला आपल्या काही जागांवर पाणी सोडावे लागले असतानाच उर्वरित राजकीय पक्षांच्या उमेदवारांचीही स्थिती काहीशी तशीच आहे. मात्र या सगळ्यात तब्बल ७२ हजार ८९७ मतदारांना एकही उमेदवार पसंत नसल्याने संबंधितांनी ‘नोटा’वर शिक्का मारला आहे. नोटाऐवजी उमदेवारांना पसंती दिली असती तर अनेक प्रभागात वेगळे निकाल लागले असते असे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने २२७ जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेस भाजपाने २२१ उमेदवार दिले होते. मनसेने २०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. निकालानुसार ४१ लाख ५० हजार ४३७पैकी तब्बल ७२ हजार ८९७ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक ९१मध्ये तब्बल १ हजार १३५ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली असून, त्याखालोखाल उर्वरित प्रभागांमध्ये शंभरपासून नऊशेपर्यंतचे मतदान ‘नोटा’ला म्हणजे प्रभागामध्ये उभे राहिलेल्यांपैकी एकाही उमेदवाराला देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)एकूण मतांच्या तुलनेत प्रमाण कमी- प्रभाग ४९ मध्ये ७३, प्रभाग १३४ मध्ये ४७, प्रभाग १३५ मध्ये ७३ आणि प्रभाग १३६ मध्ये ८२ मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती दिली आहे. - ‘नोटा’ला देण्यात आलेली पसंती पाहता एकूण मतांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरीदेखील ते उल्लेखनीय आहे.प्रभागनोटा५५३९१०५९२१४५२५१५८६९१६५१५१७५३१२४५१३४६६०२५५६५९७२६०३८०५३०९१११३५९३८४८९८५१७१०४६५४१०५८१०१०७६२९१०८६४८१११५२०११२५१८११७५६०१२०५४७१४६७७६१५२६६११५३८१११५४५८९१५५७७८१६९६१११९०७४४१९१६१११९२७००१९३७२०१९८९६४१९९५२६२००६८६२०२५४७२०३६१८२०४७२४२१०८०७२२३६३१२२५५८६
‘नोटा’ला ७२,८९७ जणांची पसंती
By admin | Published: February 26, 2017 1:50 AM