शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

नोटबंदीचा ड्रग्ज तस्करांनी घेतला धसका

By admin | Published: November 16, 2016 5:58 AM

ड्रग्जचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीने चालतो. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक असतो. चलनातून या नोटाच रद्द झाल्याने या तस्करांवर संकट

मुंबई : ड्रग्जचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीने चालतो. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक असतो. चलनातून या नोटाच रद्द झाल्याने या तस्करांवर संकट ओढावल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे काही प्रमाणात हा धंदा थंडावल्याने पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथकाने सुटकेचा निश्वास सोडलेला दिसून आला. गेल्या दहा महिन्यांत १ कोटी ७२ लाख १८ हजार ३०० रुपये किमतीचे ड्रग्ज अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केले आहेत. व्यवहारातून अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने तस्करांनीही धसका घेतला आहे. नोटाबंदीमुळे तस्करांना जुन्या नोटा स्वीकारणे शक्य नसल्याने त्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पैसे देऊन अमली पदार्थ विकत घेणारे आणि देणारे या दोघांवरही सध्या संकट ओढावल्याने अमली पदार्थविरोधी पथकानेही थोडासा सुटकेचा नि:श्वास सोडलेला दिसून आला. हेरॉईन, कोकेनच्या तस्करीत पुढे असलेल्या नायजेरियन तस्करांचीही तारांबळ उडालेली दिसून आली. पूर्वी झोपडपट्टी परिसरातील मजूरवर्ग भट्टीवरील दारूला अधिक पसंती द्यायचे. त्यात अवघ्या १०० ते २०० रुपयांमध्ये गांजा उपलब्ध होतो. त्यात पाच ते सहा जणांमध्ये एक चिलीम पेटवून त्यात गांजा टाकला तरी सहज सर्वांची गरज भागायची. आजही गोवंडी, मानखुर्द, भांडुप सोनापूर, शिवडी, मशीद बंदर, धोबीघाट अशा भागांमध्ये गांजाचा धुरांडा कायम आहे. मात्र हा धुरांडा कायम असतानाच कमी पैशात जास्त नशा अनुभवण्यासाठी तरुणाईसह सामान्य मजूर हा एमडीच्या जाळ्यात ओढला गेला. पूर्वी सिगारेट म्हटली की मॉडर्न राहणीमानाचे प्रतीक मानले जात होते. कालांतराने आधुनिकतेबरोबर नशेचा टे्रण्डही बदलला. याच सिगारेटची जागा कोकेन आणि हेरॉइनने घेतली. हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये कोकेन, एलएसडी, मेथ, हेरॉईन, बटन याचा वापर केला जातो. याचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीनेच होत असल्याने तस्करांचा धंदा तेजीत सुरू होता. मात्र नोटाबंदीमुळे हा व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस हेच चित्र पाहावयास मिळणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने लोकमतला दिली. (प्रतिनिधी)