शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 7:15 PM

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीससोलापूर : आॅनलाईन लोकमत महापालिका निवडणुकीत मोठ्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या १५ उमेदवारांना खर्च सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६२३ उमेदवार आहेत. प्रचाराचा रंग भरू लागला आहे. सर्व प्रभागात चौरंगी, तिरंगी आणि दुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी दररोज दुपारी निवडणूक कार्यालयात हजेरी लावून खर्च सादर करीत आहेत. गतवेळच्या निवडणुकीतील २६0 उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात असलेले बहुतेक उमेदवार खर्च सादर करण्याच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी आयोगाच्या विहित नमुन्यात दररोजच्या खर्चाचा अहवाल द्यावा लागत आहे. पण केवळ गंमत म्हणून निवडणूक लढविणारे १५ उमेदवार खर्च सादर करण्यासाठी अद्याप कार्यालयाकडे फिरकले नसल्याचे दिसून आले आहे. आयोगाच्या नियमानुसार तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसात खर्च न आल्यास नोटीस बजाविण्यात येते. यातील १३ उमेदवारांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली तर दोन उमेदवारांना मंगळवारी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. असा आहे निवडणूक खर्च. उमेदवारास खर्च लावताना प्रत्येक गोष्टीनुसार आयोगाने भाड्याचे दर निश्चित केले आहेत. त्यामध्ये स्पीकर: २२00 रु., बॅटरी: ५५0, ट्यूबलाईट: ३५, हॅलोजन: ४४0, पंखा: ३३0, कुलर: ३५0 ते ५00, जनरेटर: १७00 ते ४000,फोकस: २५0, मंडप: २५0 स्क्वे. मीटर, सोफासेट: ४00, सतरंजी:२0, कारपेट: ४0, बेडशीट:२0, ड्रम:८0, पेन्डल: ५५0 (१0 बाय १0), खुर्ची (१00): ५५0, प्रोेजेक्टर: १२00 ते ५२00, होर्डिंग्ज: ४५ स्क्वे. फूट, कापडी बॅनर: ६५,प्रिंटिंग पोस्टर (२0बाय ३0): ३७00. मतदान कार्ड (१000): ५00, झेंडे: १२५ स्क्वे.मीटर, जीप: ३000, मिनी बस: ६५00, कार: २५00 ते ४000, रिक्षा: ७00,मोटरसायकल: १२0, ट्रॅक्टर: १२00. -------------------------------------चहापानावर जादा खर्चआतापर्यंत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात मंडप, स्पीकर, कार्यालयीन चहापान, हॅन्डबिल, जेवण आदी खर्चावर भर दिला आहे. असा आहे हा खर्च. चहा: ५ ते १0 रु. कॉफी:२0, लस्सी: ३0, शीतपेय: ३0, स्नॅक्स: ३0, राईस प्लेट: ११0 ते १५0, पाणी पाऊच: ५, बाटली: २0, जार: ४५, फटाके: २५0 ते ५00, हार: १00, गुच्छ: २0. फुले (१00 किलो) : ३000 ते ६000.