पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात रुग्णांना मुदतबाह्य सलाईन लावल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून रुग्णालयाल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावून ७२ तासांत त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. या चौकशीदरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईले. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात एका रुग्णाला उपचारांदरम्यान मुदत संपलेली सलाईन लावण्यात आली होती. याबाबत रुग्णाच्या नातलगांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच विविध उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या इतर रुग्णांनाही गेल्या २१ दिवसांपासून मुदत संपलेल्या सलाईन लावल्या जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे दाखल झालेल्या आणि बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे सर्व कर्मचारी ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, रुग्णांच्या जिवाशी खेळण्याच्या या प्रकाराबद्दल परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल हे १०० खाटांची क्षमता असलेले एकमेव मोठे रुग्णालय आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दैनंदिन तपासणीसाठी येतात. शिवाय येथे प्रसूती विभाग, बालरुग्ण विभाग, सर्वसामान्य आणि संसर्गजन्य उपचार असे स्वतंत्र विभाग असल्याने प्रथमोपचारांसाठी रुग्णांना दाखल केले जाते. रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. महाजन व कर्नल चौधरी यांच्यावर बोर्ड प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अविनाश बागवे, अतुल गायकवाड, संजय कवडे यांनी केली होती. दरम्यान, लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणाविषयी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर म्हणाले, ‘‘रुग्णालयातील २०० सलाईनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल तयार करण्यात आला असून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडे तो पाठविण्यात आला आहे.’’>भूमाता ब्रिगेडचे आंदोलनभूमाता ब्रिगेडने या प्रकरणाविरोधात रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असून, याबाबत त्वरित कडक कारवाई करावी. महिला व बाल विभागात अशा प्रकारे रुग्णांच्या जिवाशी होत असलेला खेळ धोकादायक असून आरोग्यमंत्री, पालकमंत्री व संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही देसाई यांनी केली. रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा गैरकारभार चालू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी.- तृप्ती देसाईरुग्णालयाने निष्काळजीपणा केला असून, या प्रकरणाची योग्य ती तपासणी करुन संबंधितांवर अन्न व औषध प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये डॉक्टर व नर्स यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.- व्ही. ए. जावडेकर, सहआयुक्त, औषध विभाग
कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला नोटीस
By admin | Published: August 23, 2016 1:14 AM