नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी मंगळवारी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाला नोटीस बजावून २९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. सानंदा हे खामगाव नगर परिषदेतील घोटाळा प्रकरणात आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने यापूर्वी सानंदा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सानंदा यांनी खामगाव सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो २० फेब्रुवारीला फेटाळण्यात आला. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सानंदा यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर, अॅड. राजेंद्र डागा व अॅड. जे. बी. गांधी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)
सानंदांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला नोटीस
By admin | Published: February 24, 2016 1:02 AM