- राजेश मडावी चंद्रपूर : घातक कचरा निर्माण करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणाºया राज्यातील ५ हजार ८७२ उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत. या घटनेने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार राज्यातील ५ हजार ८७२ उद्योग घातक कचरा निर्माण करीत असल्याचे दिसून आले. या उद्योगांनी उत्पादनासोबतच सामायिक सांडपाणी प्रक्रिया, कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट संयंत्रणा बसविली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील आठवड्यात या उद्योगांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील १ हजार १३४ उद्योगांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक कल्याण विभागाचा लागतो. या कंपन्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.घातक कचरा निर्माण करणारे उद्योगविभाग उद्योग संख्याअमरावती ७२औरंगाबाद ३२४चंद्रपूर १३१कल्याण ८७६कोल्हापूर ३५७मुंबई ३८०नागपूर ३४०विभाग उद्योग संख्यानाशिक ४७९नवी मुंबई ६९०पूणे ११३४ठाणे ७४१रायगड ३४८एकूण ५८७२
घातक कचरा निर्माण करणाऱ्या ५ हजार ८७२ उद्योगांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:15 AM