कोल्हापूर : प्रदूषण निकषांची पूर्तता होत नसल्याने कागल, हातकणंगले औद्योगिक वसाहत, गोकुळ दूध प्रकल्प, मेनन बेअरिंग उद्योग व इचलकरंजीतील ‘सीईटीपी’ या उद्योगांना उद्योग बंद करून पाणी व वीज का तोडू नये, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सूर्यकांत डोके यांनी ही माहिती न्यायालयासमोर दिली.