शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

कर्ज फेडण्यासाठी छापल्या नोटा

By admin | Published: April 09, 2017 3:42 AM

कर्ज फेडून झटपट श्रीमंत होण्यासाठी घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करणाऱ्या त्रिकुटाचे बिंग फोडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली

मुंबई : कर्ज फेडून झटपट श्रीमंत होण्यासाठी घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करणाऱ्या त्रिकुटाचे बिंग फोडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे. अटक त्रिकुटाकडून २ हजार किमतीच्या ७० लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य सूत्रधार जतीन सोलंकी (३७), सचिन बन्सी (२५), विजय कांबळे (३९) या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.नालासोपारा येथील रहिवासी असलेला सोलंकीवर ८ ते ९ लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी सारे मार्ग बंद झाल्याने, त्याने नव्या चलनातील २ हजार दराच्या बनावट नोटा छापण्याचे ठरविले. यासाठी त्याने डीटीपी आॅपरेटर असलेल्या मित्र सचिन बन्सीची मदत घेतली. स्कॅनर, झेरॉक्स मशिन, लॅपटॉपच्या खरेदीची जबाबदारी कांबळेवर सोपविली. तिघांनीही झटपट लखपती होण्याचे स्वप्न रंगविले. नालासोपारा येथील घरातच सोलंकीने बनावट नोटांची छपाई सुरू केली. सुरुवातीला त्यांनी नव्या चलनातील २ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाडवी, आशा कोरके, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, किशोर पाटील, शरद धराडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह पोलीस अंमलदार पथकाने तपास सुरू केला. गेल्या आठवडाभर तपास पथक या त्रिकुटावर लक्ष ठेवून होते.शनिवारी हे तिघे वांद्रे किल्ला येथे पैशांच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून तपास पथकाने या त्रिकुटाला अटक केली. त्यांच्या झडतीतून २ हजार रुपये किमतीच्या तब्बल ७० लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा ही मंडळी ५० टक्के कमिशनवर देणार होती. गावाकडील भागात या नोटा चलनात आणण्यात येणार होत्या, तसेच हवाला मार्गेही या नोटा व्यवहारात आणण्याचा या त्रिकुटाचा प्रयत्न होता.त्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याचा पर्दाफाश केला. त्यांच्या नालासोपारा येथील घरातही पोलिसांनी छापा टाकून स्कॅनर, झेरॉक्स मशिन, बनावट नोटांसाठी लागणारी साधने हस्तगत केली आहेत. तिघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)५०० च्या नोटांचीही छपाईदोन हजार दराच्या नव्या नोटांचा प्रयत्न यशस्वी होताच या त्रिकुटाने नव्या दराच्या पाचशे रुपये दराच्या नोटांच्या छपाईचे काम सुरु केले होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेने हा डाव उधळून लावला.रिपाइंचा कार्यकर्तानालासोपारा येथील रहिवासी असलेला विजय कांबळे हा रिपाइं पक्षाचा कार्यकर्ता आहे. बेरोजगारीमुळे तोही या कटात सहभागी झाला होता.अशी व्हायची छपाई...दोन हजार दराची खरी नोट स्कॅन करुन त्यातील क्रमांकांमध्येही ही मंडळी फेरफार करत होती. यामध्ये बन्सीकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर सोलंकी या नोटांची झेरॉक्स काढायचा. तिघेही कटरने कागदावरील या नोटा एकसारख्या आकारात कापत होते.