शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सोळा साखर कारखान्यांना नोटिसा

By admin | Published: January 16, 2015 11:05 PM

साखर सहसंचालकांची कारवाई : ‘एफआरपी’नुसार १४ दिवसात दर देण्याची सूचना

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर दिला नाही. याप्रकरणी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना कोल्हापूर येथील साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच ऊस उत्पादकांना गळितासाठी ऊस नेल्यापासून चौदा दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.शुगर केन कंट्रोल १९६६ कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर दिला पाहिजे. परंतु, जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ‘एफआरपी’नुसार दर दिला नाही. साखरेचे दर कमी झाल्यामुळे ‘एफआरपी’प्रमाणे दर देता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच साखर कारखानदारांनी एकत्रित बैठक घेऊन प्रति टन १९०० रूपयेप्रमाणे दर जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा केले आहेत. काही कारखान्यांनी तर प्रति टन चौदाशे ते पंधराशे रूपयेप्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. या दराप्रमाणेही कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेळेत बिले दिली नाहीत. यासह अनेक तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त आणि साखर सहसंचालकांकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांना, ‘एफआरपी’प्रमाणे दर न दिल्याबद्दल नोटीस बजाविली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे बंधनकारक असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना दर का दिला नाही? या सर्व प्रश्नांवर कारखानदारांकडून त्यांनी खुलासा मागविला आहे. आठ दिवसात त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर साखर आयुक्तांकडून पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी, साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे शासनाने मदत केली पाहिजे, तरच ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील कारखान्यांची उताऱ्यानुसार एफआरपीसाखर कारखानाएफआरपी दरहुतात्मा (वाळवा)२६३९.२६विश्वास (चिखली)२५७६.०१सर्वोदय (कारंदवाडी)२५३७.६८राजारामबापू (साखराळे)२४७०.३६राजारामबापू (वाटेगाव)२४२१.०१क्रांती (कुंडल)२४१०.२३सोनहिरा (वांगी)२४०७.८९उदगिरी शुगर (बामणी)२३२२.४९साखर कारखानाएफआरपी दरमोहनराव शिंदे (म्हैसाळ)२३०६.४४महांकाली (क़महांकाळ)२२००केन अ‍ॅग्रो (कडेगाव)२१२६.२८माणगंगा (आटपाडी)२०७८.७९वसंतदादा (सांगली)२०६९.७५यशवंत शुगर (नागेवाडी)२००२.९३डफळे (जत)१९११.३९सदगुरु श्री श्री शुगर१७७२शासनाने कारखान्यांवर कारवाई करावीच‘एफआरपी’नुसार दर न देण्यास आम्ही काही शेतकऱ्यांचे शत्रू नाही. आम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं असून शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च परवडत नाही, त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासन साखर कारखानदारांची अडवणूक करीत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू नये, अशीच त्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य शासनाने आणि साखर सहसंचालकांनी जरूर कारखान्यांना नोटिसा बजावून कारवाई करावीच. त्यांच्या नोटिसांना योग्य उत्तर देऊ, असे मत क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी व्यक्त केले.