शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

नोटेवरील गांधी

By admin | Published: January 29, 2017 12:34 AM

गांधीजींचे कोणते चित्र सर्वात लोभस वाटते, असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचे उत्तर येईल नोटेवरील. मला प्रश्न पडला की, गांधींचे चित्र लोभस की नोट लोभस? क्षणभर वाटते

- डॉ. नीरज देव गांधीजींचे कोणते चित्र सर्वात लोभस वाटते, असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचे उत्तर येईल नोटेवरील. मला प्रश्न पडला की, गांधींचे चित्र लोभस की नोट लोभस? क्षणभर वाटते ‘स्थानम् प्रधानम्’. नोटेवर गांधी असोत की गोडसे; नोटेमुळे लोभसच वाटतील. पण प्रश्न दुसरेच आहेत, नोटेवर गांधींचे चित्र असावे का? आणि असलेच तर पाचावर अन् पाचशेवर गांधींचे एकच चित्र का? पाचावर तरुण गांधी व पाचशेवर वृद्ध गांधी का नकोत? तरुण गांधींपेक्षा वृद्ध गांधी अधिक परिपक्व असावेत म्हणून तर असे नसावे ना?असे सांगतात की, लोकमान्य टिळकांना जेव्हा गांधी पहिल्यांदा भेटले तेव्हा खाडिलकरांनी विचारले, ‘कसा वाटतो हा पोरगा?’ तेव्हा टिळक म्हणाले, ‘बनिया आहे.’ तीच बाब रजनीशांनी वारंवार मांडली. बनिया म्हणजे वैश्यवृत्तीचा. वैश्यवृत्ती म्हणजे हिशोबीपणा. असे सांगतात की, एकदा गांधींच्या सभेनंतर लोकांनी पैसे अर्पण केले. मुक्कामाच्या स्थळी आल्यावर त्यांनी ते मोजायला सुरुवात केली, त्यात त्यांना एका बाईने टाकलेली कानातील एक कुडी मिळाली, दुसरी मिळेना. गांधीजी कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘ती बाई केवळ एकाच कानातील कुडी टाकणार नाही. टाकली तर दोन्ही कानातील टाकील. दुसरी तिथेच पडलेली असेल.’ त्यांनी मध्यरात्री एकाला तिकडे पिटाळले. त्याने ती शोधून आणेपर्यंत गांधीजी जागेच होते. ती मोजून त्या राशीत टाकल्यानंतरच ते झोपले. या हिशोबीपणाला काय म्हणावे? महात्मा की बनिया?महात्म्याला तर धनद्रव्य-सोने-चांदी सारे काही मृत्तिकेसमान असते. देहूच्या वाण्याबाबतचा अनुभव तोच अन् धनाला स्पर्शही न करणाऱ्या गदाधर-रामकृष्णासंबंधातील अनुभवही तसाच. तितक्यात मनात विचार आला, धन आती-जाती माया आहे ते खरे वाटावे म्हणून तर नोटेवर गांधीजी नसावेत ना? कारण सत्याचा गांधीजींनी घेतलेला सततचा ध्यास. पण सत्य गांधीजींना सापडले होते का? बहुधा नसावे, म्हणून तर प्रामाणिक गांधींनी त्यांच्या आत्मकथेला शीर्षक दिले ‘सत्याचा शोध’; सत्याचा अनुभव नव्हे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर गवसले. सत्याच्या शोधाची आस प्रत्येकालाच असते. प्रत्येक जण सत्यालाच शोधतो. कोणी ध्यानात, कोणी योगात, कोणी भोगात, कोणी शास्त्रांत, कोणी श्रद्धेत तर कोणी अंधश्रद्धेत. पण सत्य तर हे आहे की, ९९ प्रतिशतांचा विश्वास असतो की नोट सत्य आहे, किंबहुना नोटेच्या आधारे सत्याजवळ जाता येईल, सत्याचा शोध घेता येईल. अनुभवच तसा असतो. नोटेच्या प्रभावाने खोटी प्रमाणपत्रे खरी होतात, नसलेली प्रकट होतात. होत्याचे नव्हते होते व नव्हत्याचे होते होताना दिसते. अन्यायाला निर्दोषत्वाचा दाखला मिळतो, कायदा गाढव होतो आणि हो लोकांची मते खरीदता येतात, मनपरिवर्तनही काहीसे घडविता येते. कळत नकळत सत्य विसरता येते.सत्याची गरज आपल्याला नसतेच, किंबहुना स्वत:च्या सुखाचा त्याग करून मिळणारे सत्य आपल्याला नको असते. आपल्या सत्याचा शोध हा सुखाच्या शोधामार्फतच जातो. त्यामुळेच उघडेनागडे सत्य आपल्याला ओंगळच वाटते. कदाचित ते जाणीव करून देते आपल्या नश्वरतेची, अपूर्णतेची. खरे सांगायचे तर सत्य अर्ध्याने कधीच भेटत नाही; भेटले तर पूर्णच भेटते. त्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ उत्तर देणाऱ्या सत्यवान युधिष्ठिराचा रथ जमिनीला टेकला. सत्य हेच असते की सत्याच्या पक्षात कोणीच नसतो, पण प्रत्येक जण सत्याला आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करतो. परिणामी आपलेच सत्य खरे असे प्रत्येकालाच वाटते. यालाच सत्याभास म्हणत असावे. गांधींचेही तसेच होते. ते कोणाच्याच पक्षात नव्हते, त्यांचा पक्ष ते स्वत:च होते. अन् हो नोटेचेही तसेच असते; आपलीच आपल्याला मोलाची वाटते.आणखी एक गोष्ट; सारे काही खरेदी करता येते, पण सत्याची खरेदी करता येत नाही, नोटेची पण खरेदी करता येत नाही, ती कमवावीच लागते. सत्य नि नोटेत हेच साधर्म्य असते. सत्याचे प्रतीक म्हणून आपण गांधींना मानतो, त्यामुळेच त्यांचे चित्र नोटेवर छायांकित असावे? सत्याभास निर्माण करण्यासाठी!