मुंबई : आपल्या राज्यात शहीदांच्या कुटुंबियांना केवळ साडे आठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.अथर्व फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात हा कार्यक्रम पडला़ त्यात सैन्यातील जवानांचा आणि शहीद कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच जवानांचा सन्मान करणारा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, या दोनच दिवशी राष्ट्रभक्ती जागरुक होणे चुकीचे आहे. आपल्या दैनंदिन जगण्यातून देशासमोरील आव्हानांविरोधात दिलेला लढा ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून भ्रष्टाचार, अत्याचार या समस्यांविरोधात संघर्ष करणे ही खरी देशसेवा आहे. या देशसेवेतून खºया अर्थाने आपल्या जवानांसाठी आदरांजली ठरेल.यावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश प्रगतीपथावर असून त्यात सर्वाधिक योगदान सीमेवरलढणाºया जवानांचे आहे. त्यांच्याशिवाय इतिहास घडू शकत नाही. आपणही त्यांच्यासारखे समर्पित होऊन देशसेवा केली पाहिजे. देशासाठी शहीद होणाºया जवानांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही़
शहीदांच्या कुटुंबियांना आता २५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:09 AM