शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

आता प्रशासकीय निर्णय झटपट होतात - प्रवीण परदेशी

By admin | Published: July 11, 2017 6:18 PM

लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये सहभागी झालेले राज्याचे मुख्य अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रशासकीय मान्यतासंबंधीचे निर्णय झटपट होत असल्याचे सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये सहभागी झालेले राज्याचे मुख्य अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रशासकीय मान्यतासंबंधीचे निर्णय झटपट होत असल्याचे सांगितले. त्यांना  प्रशासकीय मान्यता प्रलंबित का राहतात? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आता वेगवान निर्णय होत असल्याचे सांगितले. तांत्रिक तपासणी करुन, वित्तीय समितीतून मान्यता घेतली जाते. नस्ती पध्दत आता आम्ही वापरत नाही. वेगवान निर्णय होत आहेत असे त्यांनी सांगितले. 
 
कर्नाटक राज्याला लागून असलेल्या बंद पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी सोडणार आहोत असे त्यांनी सांगितले.  जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. 
तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे. लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. 
 
आणखी वाचा 
कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय - गिरीश महाजन
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
 
जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला. 
 
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही. लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. 
 
जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत असे कौतुक गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकमतचे केले. त्यांनी लोकमतने जलयुक्त शिवाराच्या कामचा घेतलेल्या आढाव्याचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे, प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे राम शिंदे म्हणाले.