शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

खडसेंनंतर आता महाजन गोत्यात

By admin | Published: June 17, 2016 6:05 AM

भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री

मुंबई/ जळगाव : भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री गिरीश महाजनही एका जमिनीवरून अडचणीत सापडले आहेत.निवडणूक शपथपत्रात जमिनीची माहिती लपविल्याने मंत्री महाजन यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी डिगंबर केशव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. २०१४ मध्ये गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र, नामनिर्देशन पत्रासोबत त्यांनी भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील २ हेक्टर ०.८ आर ही जमीन त्यांच्या नावे असताना शपथपत्रात त्याचा उल्लेख केला नाही. भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२५ (अ) प्रमाणे खोटे शपथपत्र दाखल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे महाजन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी आयोगाकडे केली आहे. डी. के. पाटील यांनी २०१४ मध्ये महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती.

महाजन यांची निवडणूक रद्द करा : राष्ट्रवादीजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जमिनीबाबतची माहिती निवडणूक आयोगासमोर लपवली आहे. शिवाय, या जमीनी जबरदस्तीने हडप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्र परिषदेत केला. महाजन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

तावडेंची हकालपट्टी करा - विद्यार्थ्यांच्या कलचाचणी अहवालावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून स्वत:चा फोटो छापला. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण?जळगाव-औरंगाबाद महामार्गावर देवपिंप्री फाट्याजवळ ही जमीन आहे. २००१ मध्ये एकनाथ खडसे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी व इतरांनी मिळून तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना, मानपूर उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी मानपूर येथील गट क्र.१२१ व १२२ मधील ८१ आर एकर जागा खरेदी केली. गिरीश महाजन यांच्या नावावर असलेली जागा सुपडू जंगलू तायडे व गोविंदा तायडे या दोघांच्या नावे ५० टक्के व भास्कर सुका तायडे व राजाराम सुका तायडे, बाजीराव सुका तायडे यांच्या नावे विभागून आहे. कारखान्याच्या जागेवर आता फळबाग लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगल्या मोबदल्याचे तसेच मुलांच्या नोकरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे आमची जमीन आम्हाला परत करावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.जमीन परत करू - महाजन

साखर कारखान्यासाठी या जागेची खरेदी झाली होती. परंतु कारखान्याच्या नावे २५ एकर जमीन लावून उर्वरित जमीन माझ्यासह काही संचालक व खडसे कुटुंबीयांच्या नावावर लावण्यात आली. ही जागा माझ्या नावावर असल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे तीन निवडणुकांच्या शपथपत्रात त्याची माहिती दिली नाही. या जमिनीतून कोणतेही उत्पन्न घेत नसल्याने प्राप्तीकर खात्याच्या विवरणपत्रातही उल्लेख नाही, शेतकऱ्यांची मागणी असेल तर ती जमीन परत करू, असे गिरीश महाजन म्हणाले.