आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:16 PM2023-07-05T16:16:20+5:302023-07-05T16:17:08+5:30

"कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण."

Now Amol Kolhe's big responsibility in sharad Pawar's NCP Jayant Patal made an open offer in front of pawar | आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

googlenewsNext


मुंबई - शिवसेनेच्या बाबतीत जे झाले, तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोकांचा आहे. पण राष्ट्रवादी येथे बसलेल्या सर्वांची आहे आणि तेथे गेलेल्या सर्वांनी राष्ट्रवादीसाठी काम केले आहे. आपल्या सर्वांची ही राष्ट्रवादी नामशेश करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे, अशी भूमिका ठेऊन कुणी काम करत असेल, तर आज सर्वांनी विचार करायला हवा. आजूनही वेळ गेलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी अमोल कोल्हे यांनाही शरद पवार यांच्या समोरच मोठी ऑफरही दिली आहे. ते शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, "शरद पवारांचा झंजावात महाराष्ट्रात फिरायला लागला, तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुनूक आपण सातारा आणि कराडमध्ये पाहिली आहे. वय कितीही झाले असले तरी या नेत्याचा संपूर्ण भारतात दरारा आहे, यावेळी जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या एका क्लिपचाही उल्लेख केला.

साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा -
कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे, पक्षात चर्चा केल्याशिवाय कारणे बरोबर नाही. पण आता पक्षातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रात फिरू आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा स्वाभीमानी बाना महाराष्ट्राने कसा जपला आहे. हे सांगायचे काम तुम्ही करा. संपूर्ण महाराष्ट्र साहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार, असा मला विश्वास आहे, अशी ऑफरही पाटिल यांनी कोल्हे यांना दिली.

'त्या' लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत, हे लक्षात ठेवा -
आणखी खाते वटप झालेले नाही. मला काळजी आहे, की, उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे गेले त्यांची तक्रार काय होती. जर तीच तक्रार पुन्हा एकदा येऊन बसली असेल. तर त्या लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत. हे लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या मनात एवढी भीती मी महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिली नव्हती. म्हणून अमोल कोल्हे यांच्या मनात आलेला विचार, 'कशासाठी आहे हे राजकारण'. काही भूमिका, काही दिशा मानसाच्या मानात नेहमीच हवी, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या सोबत राहण्याची शपथही दिली.

Web Title: Now Amol Kolhe's big responsibility in sharad Pawar's NCP Jayant Patal made an open offer in front of pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.