शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

आता ढोल-ताशा पथकाचेही अॅप

By admin | Published: June 26, 2014 11:04 PM

मोबाईल म्हणजे हातातला छोटा कॉम्प्युटरच झाला आहे. तरुणाईच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आल्याने जग जवळ आल्याचे जाणवू लागले आहे.

आरोग्य सेवेचा बोजवारा : रुग्णालयाचा कारभार रामभरोसे, रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव,

अधिकारी, कर्मचाऱ्यांची निम्मे पद रिक्तभंडारा : अत्यावश्यक सुविधांमध्ये समाविष्ट असलेल्या आरोग्य यंत्रणेचा डोलारा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असतो. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. कर्मचाऱ्यांसह औषधांचा तुटवडा, शुद्ध पाण्याचा अभाव, धुळखात असलेली यंत्रे आदी बाबी आज लोकमतने विविध रूग्णालयात राबविलेल्या स्टींग आॅपरेशन दरम्यान उघडकीला आली. कोट्यवधींचा खर्च करुनही गोरगरीबांना सुविधा मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय? असा उपरोधिक सवाल इथे उपस्थित रुग्णांनी केला. गरीब रुग्णांसाठी आधारवड असलेले जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. आज सकाळी लोकमत चमुने जिल्हा रूग्णालयाचे अवलोकन केले असता, ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रामाणात असल्याची दिसून आले. सुविधांचा खालावणारा दर्जा आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध होत असलेल्या दर्जेदार सुविधा, अशी तफावत येथे आढळून आली. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्याचबरोबर आपात्कालीन स्थितीत नागरिकांना त्वरीत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना करण्यात आली़ भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे़ येथे अपघाताची संख्या अधिक आहे़ तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ या रुग्णालयात भंडारा जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील रुग्ण दाखल होत असतात़ त्यामुळे रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयात असलेल्या सोईसुविधा अपूर्ण पडत असल्याची स्थिती आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात गोर-गरिब रुग्ण उपचारासाठी अधिक येतात़ अनेकवेळा रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात येतो़ या रुग्णालयात बहुतांश पदे रिक्त आहेत़ येथील वैद्यकीय अधिकारी वर्ग १ मध्ये २२ पदे मंजूर आहेत़ जि.प.च्या एका आरोग्य अधिकाऱ्याचे काल अन्य जिल्ह्यात पदोन्नतीवर स्थानांतरण झाले आहे. रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात विलंब लागत असल्याने त्याचा फटका सामाण्य जणांना बसत आहे. जिल्हा रूग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी चिकीत्सक, भिषक, शस्त्रक्रिया, स्त्री रोग प्रसुती रोगतज्ज्ञ, बाल रोग, अस्थीव्यंग शल्य चिकत्सक, बधिरीकरण शास्त्रज्ञ, शरीर विकृती चिकीत्सक, मनोविकृती चिकीत्सक, वैद्यकीय अधिकारी चर्मरोग, कान नाक घसा तज्ज्ञ, मुख्य प्रशासकीय अधिकारी, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि मनोविकृती चिकीत्सकांचा समावेश आहे़ वर्ग २ मध्ये ३९ पदे मंजूर आहेत़ यापैकी बहुतांश पदे भरलेली आहेत़ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यात एकमेव असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, स्वच्छतेचा अभाव, रुग्णांची लुट आदी विविध समस्या भेडसावित आहेत़ तुमसर : ३ लक्ष ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची विविध तपासणी करणारी यंत्रे (मशीन्स) बंद स्थितीत आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळेतून तपासण्या कराव्या लागतात. आरोग्य विभागाचे येथे अक्षम्य दुर्लक्ष दिसत असून प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची पदे येथे रिक्त आहेत. मशीन्स का बंद आहेत की त्या तशा हेतुपुरस्पर ठेवल्या जात आहेत हे एक गुढ आहे.तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुसज्जीत इमारत तयार करण्यात आली. १०० खाटांचे रुग्णालयात मात्र रुग्णांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. येथे डॉक्टरचे केवळ एक पद रिक्त आहे. इतर पदे येथे १० ते १२ कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत. शासनाने या रुग्णालयाकरिता रुग्णांच्या विविध चाचण्याकरिता लाखोंच्या मशीन्स दिल्या आहेत. परंतु सध्या त्या धुळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती आहे. येथे रुग्णांच्या योग्य निदानाकरिता सोनोग्राफी मशीन आहे. परंतु डॉक्टर नाही. अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटर आहे, परंतु तो बंद आहे. प्रयोगशाळेतील महत्वाची सर्व उपकरणे बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. रुग्णांना तात्काळ आराम व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. त्यामुळे गरजूंना बाहेरून महागडी औषध लिहून दिली जाते. खासगी प्रयोगशाळेत तपासणी करायला येथे सांगितले जाते. येथील प्रयोगशाळेत ती केली जात नाही. येथील सीबीसी कंप्लीट सेल काउंटर मशीन बंद आहे. बाय केमीकल म शीन बंद आहे. मधुमेह, कावीळ, किडनीच्या आजारांची तपासणी मशीन सुद्धा बंद आहे. चरबीचे प्रमाण मोजणारी यंत्रसुद्धा बंद आहे. येथील बहुतेक डॉक्टर्स खासगी दवाखाना चालवितात. प्रमुख कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. येथे अधीक्षकांचे पद दोन वर्षापासून रिक्त आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)