मुंबई : अपेक्षेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली. परिणामी, आगामी काळात गृहकर्जासह विविध कर्जावरील व्याजाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. अर्थकारणातील सुधार आणि परिस्थिती पाहता व्याजदरात किमान अर्धा टक्का कपात होईल, अशी आशा उद्योगजगताला होती. मात्र, ती आशा अर्धीच पूर्ण झाली! या निर्णयानंतर रेपो रेट ६.७५ टक्क्यांवरून ६.५० टक्के इतका कमी झाला आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊनही महागाईचा आलेख वाढत असल्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतीही कपात केली नव्हती. तसेच, आर्थिक सुधारणांचा नारा देणाऱ्या केंद्र सरकारने सुधारणांच्या मुद्द्यांवर ठोस पावले उचलली तर दरकपात करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, मंगळवारी पतधोरणात व्याजदरात कपात करण्यात आली. (प्रतिनिधी)> जेव्हा रेपो दरात कपात होते, तेव्हा दोन प्रकारे या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो. पहिला प्रकार म्हणजे थेट मासिक हप्त्याच्या रकमेत कपात होते तर दुसरा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या कर्जाच्या कालावधीत कपात होते.आजच्या दरकपातीनंतर मासिक हप्ता कसा कमी होईल ते उदाहरणाने पाहू. > अतिरिक्त ६० हजार कोटी रुपये चलनातसध्या चलनामध्ये असलेल्या एकूण रकमेत ६० हजार कोटी रुपये अधिक आहेत. ६० हजार कोटींची ही रक्कम निश्चितच ‘नॉर्मल’ नाही. निवडणुका असल्या की चलनातील रक्कम वाढते, हे का होते? याचा रिझर्व्ह बँकेला पुरेपूर अंदाज आहे, असे सूचक वक्तव्य राजन यांनी केले. गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणावर पैसे चलनात आले असून, याकडे शिखर बँकेचे बारकाईने लक्ष असल्याचेही ते म्हणाले. >बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात झाली असली तरी, अपेक्षा अर्धीच पूर्ण झाल्याने आणि ही दरकपात बँका कितपत राबवू शकतील, या प्रश्नामुळे मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली. दिवसभरात सेन्सेक्स ५१६ अंशांनी कोसळला.
आता कर्ज स्वस्ताई
By admin | Published: April 06, 2016 5:22 AM