चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता वन्यजिवांची आवड असणाऱ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून मिळणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे वन्यजिवप्रेमींच्या अनुभवात भर पडणार असून, विविध कौशल्यात पारंगत होत असतानाच ताडोबातील नैसर्गिक आनंद घेता येणार आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे वाघ व तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. ताडोबा सफारीसाठी आले की वाघाचे दर्शन होणारच, याची खात्री असते. याच कारणांमुळे देश-विदेशातील सेलिब्रिटींपासून सामान्य नागरिकही ताडोबाच्या सफारीसाठी येतात. पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने मार्च ते जून २०२१ या कालावधीत वन्यजीवप्रेमींसाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करू दिली आहे. इच्छुकांना २५ प्रेब्रुवारी २०२१ पर्यंत ताडोबाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे.कुणाला मिळणार प्राधान्य ?पर्यटन, बांधकाम, वास्तुरचना, सोशल मीडिया, माहिती-तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धन अशा पाच शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय, कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची तयारी आदी अर्हता असणारेही याकरिता अर्ज सादर करू शकतात. इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताडोबा व्याघ्र व्यवस्थापनाकडून अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात करा इंटर्नशीप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:03 AM