मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार कोरोनाकाळात बंद असलेली बायोमेट्रिक उपस्थिती आता तातडीने सुरू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात पोहोचावे लागेल.
कोरोनाचा प्रादुर्भावानंतर राज्य शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती मर्यादित केली होती. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. तसेच बायोमेट्रिक उपस्थितीचा वापर स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे उशिराने कार्यालयात आले तरी लेटमार्क लागण्याची भीती नव्हती.
मात्र, २ ऑगस्टच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली तरीही बायोमेट्रिक पद्धत अनिवार्य असल्याबाबतचा कोणताही आदेश काढण्यात आला नव्हता. तो गुरुवारी काढण्यात आला.