बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेने तोडल्याने ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करू लागली आहे. काही तासांपूर्वी एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेना आव्हान दिले होते. आता पुन्हा कंगनाने ठाकरेंना आव्हान दिले आहे.
कंगना राणौतने काही वेळापूर्वी सलग ट्विट करून मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे आणि करण जोहर गँगवर टीकेचा मारा केला आहे. आज य़ांनी माझे घर उध्वस्त केले आहे, उद्या तुमचे होईल. सरकार येते जाते. आज तुम्ही सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात, एखाद्या व्यक्तीला जाळण्याच्या प्रयत्न केलात तर तो उद्या हजारोंसाठी ज्वाला बनेल, जागे व्हा, असा इशारा तिने दिला आहे.
याचबरोबर उद्धव ठाकरे आणि करण जोहर गँगने यावे, तुम्ही माझे कामाचे ठिकाण तोडलेय, आता माझे तोंड आणि शरीर तोडा. आता मी जगेन किंवा मरेन पण तुमचा खरा चेहरा उघड करेन अशी धमकीच दिली आहे.
कंगनाने गिअर बदललागेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राऊत यांनी कंगनावर घणाघाती टीका केली. संजय राऊत यांच्या टीकेला कंगनानंदेखील प्रत्युत्तर दिलं. मुंबईवर, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर इथे राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला सुनावलं. ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवा, असं थेट आव्हान कंगनानं राऊत आणि शिवसेनेला दिलं. कंगनानं तिचे शब्द खरेही करून दाखवले. आता मुंबईत येताच कंगनानं गियर बदलला आहे. मुंबईतील घरात पोहोचताच कंगनानं आपला पुढील निशाणा कोण असणार, हे स्पष्ट केलं आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. कंगनानं ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनानं आव्हान देणारी भाषा केली आहे. 'उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उद्धवस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा हा अहंकार मोडून पडेल,' अशा शब्दांमध्ये कंगनानं मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन
कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार