शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

सोन्याबरोबर गुंतवणुकीसाठी आता जमिनीचाही पर्याय

By admin | Published: February 03, 2015 10:50 PM

दापोली तालुका : मिनी महाबळेश्वरला वैभवाचे दिवस, मुंबईकरांकडून मोठी गुंतवणूक

शिवाजी गोरे -दापोली - मिनी महाबळेश्वरच्या जमिनीला सोन्याचा भाव येत असून, भविष्यात दापोली तालुक्याचा कायापालट होणार आहे. माणसाच्या जीवनात सोन्याला ज्याप्रमाणे महत्व आहे, त्यासारखेच जमिनीलासुद्धा महत्व आहे. दूरदृष्टी असणारी व्यक्ती सोन्यापेक्षा जमीन खरेदीला महत्व देऊ लागल्याने जमिनीला सोन्याचा भाव येत आहे.भविष्याच्या दृष्टीने राज्यातील अनेक उद्योजक दापोलीत जागा खरेदी करु लागले आहेत. येथील वाढते पर्यटन लक्षात घेता दापोलीचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. स्थानिकांनासुद्धा चांगले दिवस यायला लागले असून, खेडेगावातसुद्धा घराघरात चार चाकी गाडी व अन्य सुविधा पोहोचायला लागल्या आहेत. दापोली शहर व परिसरातील लोकांच्या राहणीमानात बराच बदल झाला आहे.कोकणच्या मिनी महाबळेश्वरची अनेकांना भुरळ पडली असून, या ठिकाणी भविष्यात नंदनवन झाल्याचे पाहायला मिळेल. समुद्र किनाऱ्याच्या जागा बुक झाल्यानंतर आता उद्योजकांच्या नजरा कृषक जमिनीकडे वळल्या आहेत. काहींनी तर खाडी किनारपट्टीच्या जागा खरेदी करण्यावर जोर दिला आहे.कळंबट - म्हैसोंडे खाडी, आंजर्ले खाडी, दाभोळ खाडी, उन्हवरे खाडी, भडवळे खाडी, भोपण - पंदेरी खाडी या किनारपट्टीच्या जागा खरेदीला उद्योजकांनी पसंती दिली असून, भविष्यात दाभोळ खाडीतील भीव बंदर, भोपण पंदेरी, आधारी, भडवल या समुद्र खाडीत शिपयार्ड प्रकल्प प्रस्तावित आहेत.दापोलीतील थंड वातावरण आणि निसर्गसौंदर्याची अनेकांना भुरळ पडल्याने जमिनीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी दापोलीत चुकून एखादा प्रकल्प झाला असेल. दापोली शहरातील रुपनगर नावाचे गृह संकुल सर्वांत मोठे संकुल होते. मुंबईच्या धर्तीवरील हे पहिले संकुल होते. परंतु आता मात्र दापोली शहर व आजूबाजूच्या गावात अनेक प्रकल्प उभे राहात आहेत. दापोली तालुक्यातील शिर्दे येथे खासदार गजानन कीर्तीकर यांची १०० एकरची बाग आहे. शिर्दे, सडवे, कोळबांद्रे हा मुबलक पाणी असणारा परिसर आहे. त्यामुळे या गावातील परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस आहेत. सडवे - कोळबांद्रे या परिसरात सनब्रीक नावाचा मोठा बंगलो प्रोजेक्ट सुरु आहे. तालुक्यातील विविध भागात चांगले प्रकल्प यायला लागले आहेत.दापोली शहरातील आर्याव्रत या बंगलो अ‍ॅग्रो टुरिझमची क्रेझ निर्माण झाली. दापोली म्हटलं की, आर्याव्रत हे नाव पर्यटकांच्या चटकन डोळ्यासमोर येऊ लागलं परंतु गेल्या ५ वर्षात असं अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स, बंगलोस्कीम, प्लॉटिंग स्कीम सुरु आहेत.ओएलएक्सवरसुद्धा दापोली मिनी महाबळेश्वरचा बोलबाला.कोकणाचे मिनी महाबळेश्वर कॅलिफोर्नियाच्या वाटेवर.अनेक प्रदूषणविरहीत प्रकल्प दापोलीच्या वाटेवर.दापोलीत येणाऱ्या प्रकल्पाने विकासदर उंचावला.वर्षाला सुमारे ५ हजार खरेदी-विक्री प्रकरणाची होतेय नोंद.दापोलीत खाड्यांचा भविष्यात विकास व्हायला हवा.भारती शिपयार्डसारखे ५ ते ६ जहाज बांधणी प्रकल्प दापोलीच्या वाटेवर.दापोलीत गॅसवरील दोन वीज प्रकल्प येण्याची शक्यता.गुडघं - भोपण येथे गॅसवरील जीएमआर वीज प्रकल्पाच्या हालचाली सुरु.जीएमआर वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा हिरवा कंदील.दाभोळ - भीवबंदर येथे राज्यातील सर्वांत मोठा मरिन इंजिनिअरिंग प्रकल्प लवकरच होणार.पर्यटनातही दापोली कोकणात अव्वल.दापोलीच्या किनाऱ्यावर हॉटेलसाठी जागा घेतल्याने भविष्यात ३ स्टार, ५ स्टार हॉटेल्स लवकरच उभी राहणार.कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई दापोलीत २०० एकरवर चित्रपट स्टुडिओ काढण्याच्या तयारीत.हर्णै बायपास वाघवे - म्हैसोंडे येथे ५०० एकर जमिनीवर क्रिकेट स्टेडियम होण्याची शक्यता.