रत्नागिरी : अर्कानुम्झ एंटरप्रायझेसने आपल्या पहिल्या खास ‘डायरेक्टनेता’ या राजकीय मोबाइल अॅपचे अनावरण केले आहे. त्यातून राजकीय नेते आणि त्यांच्या मतदारसंघांमधील दरी भरुन काढण्यास मदत होईल. पंकज सावर्डेकर आणि प्रवीण रमेश काळे या संस्थापकांनी या अॅपची रचना पोहोचण्यास कठीण असलेल्या राजकारण्यांसोबत थेट फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जोडले जाण्यासाठी केली आहे.सामान्य माणूस आता पोहोचण्यास कठीण असलेल्या नेत्यांपर्यंत जास्त कार्यक्षमतेने पोहोचू शकतो आणि आपल्या समस्यांकडे तत्काळ लक्ष वेधून घेऊन सोडवून घेऊ शकतो. तसेच समस्येवर काम सुरु असताना त्याला नियमित अपडेट्सही मिळत राहतील. हे अॅप राजकारणी आणि मतदार यांच्यातील संवादात पारदर्शकता आणेल, जो जनता आणि नेता यांच्यातील संबंध दृढ करेल. या अॅपच्या मदतीने जनता (वापरकर्ते) अॅप कॉल आणि मेसेजच्या मदतीने आपल्या समस्या किंंवा चिंंता विचारु शकतात, ज्यासाठी त्यांना नेत्याकडून त्याच अॅपद्वारे पावती मिळेल, हे यात एक अतिरिक्त वैशिष्ट्यही आहे, जिथे सामान्य माणूस (वापरकर्ता) आपल्या नेत्यासोबत थोडक्यात परंतु मर्यादित चॅट करु शकेल आणि आपल्या प्रश्नांवर चर्चा तसेच उत्तर अत्यंत सोप्या पद्धतीने मिळवू शकेल. या अॅपचा युएसपी म्हणजे नेत्याला विचारण्यात आलेल्या केसेसबाबत वेळेत अहवाल मिळतील आणि केसच्या संपूर्ण प्रक्रियेवर ती सोडवण्यात येत असताना तो त्यावर लक्ष ठेवू शकेल. या अॅपच्या मदतीने कॉल करणे किंवा मेसेज करणे, मेसेजिंंग किंंवा कॉलिंंग अॅप्सच्या या युगात मोठी गोष्ट नाही. परंतु, एका राजकीय अॅपवर रिपोर्टिंग यंत्रणा असणे ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. ही वेबसाईट डायरेक्ट नेताशी जोडलेल्या नेत्यांच्या नियमिती कामगिरीचे अहवाल देईल. त्यामुळे सामान्य माणसाला नेत्याबाबत आणि त्याने आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाबाबत माहिती मिळू शकेल. (प्रतिनिधी)या अॅपच्या मदतीने नेता आपल्या व्यग्र दिनक्रमात ढवळाढवळ न करता त्याच्या मतदारसंघासोबत दिवसाच्या कोणत्याही वेळी कुठूनही संपर्कात राहू शकतो. या अॅपमुळे नेत्यांवर अंकुश ठेवण्यातही मदत होणार आहे. नेते आपल्या मतदारांना फसवू शकणार नाहीत.याशिवाय नेत्यांपर्यंत पोहोचलेल्या शंका आणि त्यांची सोडवणूक यांचीही माहिती मिळू शकेल. लोकांच्या आणि राजकारण्यांच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन या अॅपची रचना केली आहे, जे नेत्याच्या त्याच्या मतदारसंघाच्या गरजांनुसार कस्टमाईज करण्यात आले आहे.
आता नेता भेटणार थेट मोबाईलवर
By admin | Published: November 15, 2015 10:05 PM