लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतात दरवर्षी शेकडो वाघांचा मृत्यू झाला असून, २०२३च्या सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यांमध्येच देशात ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. देशात वाघांचा सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशमध्ये होत असून, यानंतर वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीसमोर आले आहे; मात्र वाघांचे मृत्यू हे फार आश्चर्यकारक नसून, जानेवारी, फेब्रुवारीत मृत्यूत वाढ होत असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मृत्यू कुठे?कान्हा, पन्ना, रणथंबोर, पेंच, कॉर्बेट, सातपुडा, ओरंग, काझीरंगा आणि सत्यमंगलम अभयारण्यातून गेल्या दोन महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू नेमका कशामुळे?nनैसर्गिक मृत्यू nविजेचा करंट लागणेnविषबाधा होणे nवाघ अडकणे nवाघांमधील लढाई
जगात सर्वाधिक वाघ कुठे?भारत २,९६७रशिया ४३३ इंडोनेशिया ३७१ नेपाळ ३५५ थायलंड १४९ मलेशिया १२० बांगलादेश १०६ भुतान १०३ चीन ५५ म्यानमार २२