नाशिक : खरिपाची मदत दिलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई न देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठताच सरकारने घूमजाव केले आहे. सरकारने मंगळवारी काढलेला आदेश तातडीने रद्द करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे नवे आदेश दिले आहेत.कमी पावसामुळे खरीप पिकांची पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर-जानेवारीत मदतीचे वाटप केले. हातात नुकसानीची रक्कम पडेपर्यंत रब्बीची लागवड होऊन पिकांना नोव्हेंबरपासून वेळोवेळी अवकाळी पावसाचा फटका बसला.असे होते अन्यायकारक आदेश़़़२८ फेब्रुवारी ते १ मार्चला झालेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकच हातचे गेले. मात्र ३ मार्चला महसूल खात्याने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना अवकाळी पावसाने नुकसान झालेले असले तरी त्यांचे पंचनामे करू नयेत, असे आदेश दिले होते.
आता सर्वच पिकांचे पंचनामे
By admin | Published: March 05, 2015 2:01 AM