शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आता पंकजांना हवे आहे गृह खाते !

By admin | Published: April 16, 2017 9:09 PM

पंकजा मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 16 - मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे विधान केल्यानंतर आता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे उदघाटन त्यांच्या उपस्थितीत रविवारी झाले.या प्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या, गृह खाते हे माझे आवडते खाते असून, मला या खात्याची मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचे आत्मबळ उंचावले होते. त्यांनी केलेले काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे हे खाते मिळाल्यास आनंदच होईल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी पंकजा यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी गृहमंत्री होण्यास आवडेल, असे सांगून गृहमंत्रिपदावर दावा सांगून गुगली टाकली आहे. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सूत्रसंचालन उपअधीक्षक प्रियंका फड यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.