शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
2
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
3
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
4
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
5
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
6
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
7
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
8
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
9
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
10
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
11
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
12
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
13
Guru Pushyamrut Yoga 2024: दिवाळीपूर्व येणार्‍या गुरु पुष्यामृत योगावर 'या' गोष्टी लक्षपूर्वक टाळा!
14
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
15
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
16
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
17
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
18
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
19
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
20
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

आता परळ लोकल धावणार

By admin | Published: May 19, 2016 6:02 AM

लोकल ट्रेन सुटतात, अशा स्थानकांच्या यादीत आता परळ स्थानकाचाही समावेश होणार

मुंबई : ज्या स्थानकांतून लोकल ट्रेन सुटतात, अशा स्थानकांच्या यादीत आता परळ स्थानकाचाही समावेश होणार आहे. परळ टर्मिनस उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. टर्मिनसच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. या कामासाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता ५१ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.परळच्या सर्व प्लॅटफॉर्मची रुंदी दहा मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असून, एकूण पाच प्लॅटफॉर्म बांधण्यात येतील. परळच्या मध्यभागी पूर्व-पश्चिमे जोडणारा नवा पूल उभारण्यात येईल. जुन्या पुलाला मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाशी स्कायवॉकने जोडण्याचा प्रस्तावही आहे. पुलावर तिकीट घर आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. सुविधांवर भर : हे टर्मिनस उभारताना प्रवासी सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे. ५१ कोटींपैकी तब्बल २८ कोटी रुपये प्रवासी सुविधांसाठी असल्याचे पाटील यांनी सांगितले. परळ टर्मिनसचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.मालगाडीचा ट्रॅक तोडणार च्परळ टर्मिनस उभारण्यासाठी मालगाडीचा ट्रॅक तोडण्यात येणार आहे. हा ट्रॅक काढून मिळालेल्या संपूर्ण जागेत परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. च्टर्मिनसच्या कामात सर्वात शेवटची रूट रिले इंटरलॉकिंग सीस्टिमची कामे होतील.च्त्या आधी यार्ड रिमॉडेलिंग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे होणार आहेत. च्कुर्ला ते सीएसटी या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम आधी पूर्ण केले जाणार होते. अनधिकृत बांधकामांमुळे, प्रथम परळ टर्मिनस पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.