आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:58 AM2018-11-02T03:58:40+5:302018-11-02T03:59:23+5:30

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

Now people should change - Ghulam Nabi Azad | आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

googlenewsNext

औरंगाबाद/बीड : आता जनतेला बदल हवा आहे. बदल गरजेचा आहे. केंद्र व राज्यातील सरकार आता बदलण्याची गरज आहे, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे केले. तर देशातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, दलित त्रस्त आहेत. भाजपाने केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसºया टप्प्याची सांगता औरंगाबादला जाहीर सभेने झाली. भाजपा सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त महागाई असलेला देश बनला आहे. सीमेवर तीस वर्षांत मारले गेले नाहीत, एवढे जवान या चार वर्षांत मारले गेले. यांनी काळा पैसा तर आणलाच नाही; पण देशातील पांढरा पैसा काही उद्योगपतींनी पळवला. आमच्या सरकारने जे दिले होते, ते नोटाबंदी व जीएसटीमुळे या सरकारने हिसकावून घेतले. बेरोजगारी वाढवली. सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदी मौन धारण करून असतात, असे आझाद म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणणार होता? तो कुठे आहे? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होते? तेही कुठे आहेत? आता हे सांगताहेत की, ते आमचे ‘चुनावी जुमले’ होते. पुढच्या वेळी हेच सरकार सत्तेवर आले, तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत; पण संविधान बदलले गेले तर लोकशाही राहणार नाही. हे लक्षात घ्या, असा इशारा खर्गे यांनी दिला.

दुष्काळाचा जीआर म्हणजे फसवणूक
दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळाच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ फसवी घोषणा करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
खा. अशोक चव्हाण यांनी बीड येथे केला.

Web Title: Now people should change - Ghulam Nabi Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.