ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - एअर इंडियाने डोमेस्टिक फ्लाईटमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.एएनआयच्या वृत्तानुसार 18 जानेवारीपासून एअर इंडियामध्ये महिलांसाठी सहा जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकरचे अतिरिक्त शुल्क लागू करण्यात येणार नाही. इकॉनिमी क्लासमधील तिसऱ्या रांगेत महिलांसाठी सहा जागा राखिव ठेवण्यात आल्या आहेत.
एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत