पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून डाळीच्या साठेबाजांनी जेवणातील वरण गायब केल्यानंतर आपला मोर्चा तांदळाकडे वळविला आहे. नवीन हंगाम सुरू होताच थेट पंजाब, हरियाणामधून तांदळाची खरेदी करून तेथेच साठवणूक करण्यास सुरूवात काही व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे बासमती ११२१ आणि लचकारी कोलमच्या दरात मागील दहा दिवसांत क्विंटलमागे एक हजारांनी वाढ झाली आहे. देशभर बासमतीची निर्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणातून होते. नवीन हंगामात बासमती ११२१ च्या नवीन तांदळाला सुरूवातीला प्रति क्विंटल २ हजार रुपये दर मिळाला होता. मात्र, भांडवलदारांनी खरेदी करताच नवीन तांदळाला २८०० रुपये दर मिळण्यास सुरूवात झाली.तर दुसरीकडे लचकारी कोलम तांदूळ मध्य प्रदेश येथून देशभरजात असतो. यावर्र्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील मिलवाल्यांनी थेट शेतातूनच तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे नवीन तांदळाच्यादरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली असून, मार्केट यार्ड येथे तांदळाच्या दरात क्विं टलमागे५०० रुपयांनी वाढ झाली आहे. लचकारी कोलम तांदळास प्रति क्विंटल ५००० ते ५२०० रुपये दर मिळत आहे.याविषयी तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, डाळींच्या साठीबाजारावर सरकारने वेळीच कारवाई केली नाही. त्यामुळे डाळींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता सरकारने तांदळाच्या साठेबाजारावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)
आता जेवणातला भात गायब होणार?
By admin | Published: November 30, 2015 2:57 AM