शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आता सेवा हमी झाली आॅनलाइन

By admin | Published: October 04, 2015 2:41 AM

राज्य शासनाने आणलेल्या सेवा हमी कायद्यांतर्गतच्या सेवा आॅनलाइन पुरविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले.

मुंबई : राज्य शासनाने आणलेल्या सेवा हमी कायद्यांतर्गतच्या सेवा आॅनलाइन पुरविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले. अशी आॅनलाइन सेवा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. यासंबंधीच्या वेबपोर्टलचे लोकार्पण झाले असून, लवकरच मोबाइल अ‍ॅपवरही ही सुविधा दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले. ते म्हणाले की, सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून २२४ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यांचा आॅनलाइन लाभदेखील घेता येईल. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा देताना सामान्य नागरिकांचा आदर करून आणि त्यांना सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकटीच्या पलीकडे विचार करून विविध सेवांसाठी जे अर्ज आहेत, त्यांचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे. हे अर्जाचे नमुने बहुभाषिक असावेत, अशी सूचनाही मुख्य सचिवांनी केली. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम या वेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)सेवा हमी कायद्याद्वारे ४६ प्रकारचे दाखले निर्धारित वेळेत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जन्म-मृत्यू, ज्येष्ठ नागरिक, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहिन प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवासी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, ग्रामपंचायतींकडून येणारे दाखले, विधवा असल्याचा दाखला, मुद्रांक नोंदणी आदी ४६ सेवा या कायद्याच्या पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत.