शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आता एकच मिशन... अकरावी अ‍ॅडमिशन

By admin | Published: June 14, 2017 12:29 AM

वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल चांगला लागला त्याचबरोबर दहावीत तब्बल १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के तर अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण मिळविले. त्यामुळे आता नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागणार असल्याचे चित्र आहे. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात २ लाख ९२ हजार जागा उपलब्ध आहेत. त्या आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. यंदाही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागा यांच्यात तफावत आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आत्तापर्यंत सीबीएसईचे ३ हजार ३३८, आयसीएसईचे ७ हजार ६३३, आयजीसीएसईचे ७२३ विद्यार्थी सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसह अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही चांगले गुण प्राप्त झाले आहेत. मुंबई आणि उपनगरातील केसी, सिडनहॅम, एचआर, रूपारेल, रुईया, हिंदुजा, मिठीबाई, साठ्ये, केळकर, कीर्ती अशा महाविद्यायलांमध्ये प्रवेशासाठी चुरस असेल. दहावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा विचार करता प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. मुंबई विभागातच पालघर, रायगड आणि अन्य काही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.