शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

...आता तरुणींसाठी खास कोल्हापुरी चपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:49 AM

मर्दाच्या पायात झोकात शोभून दिसणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणींच्या नाजूक पायालाही मोहिनी घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रथमच खास तरुणींसाठी

विशाल शिर्के ।पुणे : मर्दाच्या पायात झोकात शोभून दिसणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणींच्या नाजूक पायालाही मोहिनी घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रथमच खास तरुणींसाठी नाजूक नजाकतीने बनविलेल्या कोल्हापुरी चप्पल तयार करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत त्या बाजारात उपलब्ध होणार आहेत.कोल्हापुरी चप्पल राज्यातील ग्रामोद्योगाचा मानबिंदू आहे. मध्यंतरी डेन्मार्कला या चप्पल पाठविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, चप्पल चावरी असून, कधी शंभर ग्रॅम तर कधी ११० ग्रॅम वजनाची चप्पल पाठविली जाते, असा प्रतिकूल अभिप्राय तेथून आल्याने मंडळातर्फे यावर गांभीर्याने विचार सुरू झाला. त्यातूनच ही कल्पना आकाराला आली. तरुणाईचा कल लक्षात घेऊन नव्या आकर्षक आकाराच्या, नाजूक कलाकुसर असलेल्या लेदरच्या चप्पल बनविल्या जाणार आहेत.यासाठी कोल्हापुरातील कारागिरांना लेदर उद्योगातील प्रख्यात कंपनीच्या माजी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत आॅगस्ट ते आॅक्टोबर-२०१७ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डिझाईन्स, आकार, वजन आणि वेष्टन अशा गोष्टींवरही प्रशिक्षणात भर देण्यात येईल. या पूर्वी देखील कारागिरांसाठी काही कार्यशाळा घेण्यात आाल्या होत्या. जागतिक बाजारपेठेत कोल्हापुरीला स्थान मिळवून देण्याचा मानस असल्याचे, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी सांगितले.