नीलिमा शिंगणे - जगड - अकोलाइयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पुनर्परीक्षा शाळा स्तरावर होईल. इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा कधी घेण्यात यावी, यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता; मात्र गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेऊन नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या शैक्षणिक नुकसानापासून वाचविले आहे.माध्यमिक स्तरावर शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर व जलद गतीने शिक्षणाद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर याबाबतचा शासन निर्णय शैक्षणिक वर्षामध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये निर्गमित झाल्याने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये नैदानिक चाचण्यांचे आयोजन करता येणे शक्य झाले नाही. म्हणूनच शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून इयत्ता नववी व इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील, तसेच नैदानिक चाचण्यांच्या निकालावरू न ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता अडचणी येऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा अवलंब करू न या सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक ते सर्व साहाय्य पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांकडून करण्यात येईल. याकरिता आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. नैदानिक चाचण्या विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येतील व या चाचण्या शाळांमधून घेण्याची जबाबदारी राज्य मंडळाची राहील. शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ मध्ये सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पद्धती अमलात आणल्यावरदेखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करू न दिली जाईल. सन २०१७-१८ या वर्षाकरिता पुनर्परीक्षा जून २०१८ मध्ये होईल. पुनर्परीक्षेकरिता मूल्यमापन पद्धती इयत्ता नववीकरिता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणेच राहील.नापास झाल्यामुळे एक वर्ष वाया जाऊन मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसे होऊ नये म्हणून दहावीप्रमाणेच नववीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. - विनोद तावडे, शिक्षण मंत्री, महाराष्ट्रआर्थिक परिस्थिती, आजारामुळे काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेची संधी आवश्यकच होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.- प्रभाकर रूमाले, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक.
आता नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी
By admin | Published: April 28, 2017 1:24 AM