शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

आता शहरी भागात शौचालयांसाठी अनुदान

By admin | Published: April 10, 2015 4:14 AM

नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात यंदापासून पहिल्यांदाच शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.

मुंबई : नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात यंदापासून पहिल्यांदाच शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. त्यासाठी एक वर्षात ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून आगामी एक वर्षात १८२० कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या ४ वर्षांत राज्यात ५६ लाख शौचालये उभारण्याची योजना आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राहुल बोंद्रे आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. १२-१५ वर्षांपूर्वी शौचालयांसाठी अनुदान मिळालेल्यांची शौचालये आता खराब झाली आहेत. त्यांना पुन्हा अनुदान देणार का, असा प्रश्न बोंद्रे यांनी केला असता लोणीकर यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला. १५० शौचालयांची उभारणी करणाऱ्या स्वच्छतादूताला २२ हजार रुपये दिले जातील. शौचालयाचे काम सुरू झाल्यानंतर ५० टक्के तर काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम दिली जाईल, असे लोणीकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)