शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आता सीबीआयच्या सहसंचालकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2016 2:14 AM

आदर्श को-आॅपरेटिव्ह सोसायटीमधील चार बेनामी सदनिका कोणत्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आहेत, या संदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या अहवालावर असमाधान व्यक्त करत, उच्च न्यायालयाने

मुंबई : आदर्श को-आॅपरेटिव्ह सोसायटीमधील चार बेनामी सदनिका कोणत्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आहेत, या संदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या अहवालावर असमाधान व्यक्त करत, उच्च न्यायालयाने सीबीआयचे सहसंचालक अमृत प्रसाद (पश्चिम परिक्षेत्र) यांना समान्स बजावले. दोन आठवड्यांनी त्यांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.‘सारासार विचार न करता अहवाल सादर केला आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. अमजदस सय्यद यांनी सीबीआयने सादर केलेला अहवाल वाचल्यानंतर म्हटले.आदर्श सोसायटीच्या फाइल्सना परवानगी मिळावी, यासाठी मंत्रालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावे चार बेनामी सदनिका ठेवण्यात आल्या. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे दोषारोपपत्रात नाही. त्यामुळे या दोन व्यक्ती कोण आहेत? आणि त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? कारवाई केली असल्यास त्यांचे दोषारोपपत्रात नाव कुठे आहे? सीबीआयला याची माहिती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारा याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गेल्या सुनावणीत खंडपीठाने सीबीआयला या दोन उच्चपदस्थांची नावे दोषारोपपत्रात का नाहीत? अशी विचारणा करत, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते, तसेच उच्च न्यायालयाने आदर्शबाबत दिलेल्या निर्णयात कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाची जागा अरुंद करण्याचे आदेश कोणी दिले? याबाबात पुढील तपास करण्याचा आदेश तपासयंत्रणेला दिला होता. मात्र, सीबीआयने याही आदेशाचे पालन केले नसल्याने, उच्च न्यायालयाने या दोन्ही बाबींबर सीबीआयला तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.गुरुवारच्या सुनावणीत सीबीआयने सीलबंद तपास अहवाल खंडपीठापुढे सादर केला. मात्र, हा तपास अहवाल वाचल्यानंतर खंडपीठाने म्हटले की, आपण या तपास अहवालाबाबत असमाधानी आहोत. तपास अधिकाऱ्याने सारासार विचार न करता अहवाल सादर केला आहे. पुढील सुनावणीस सीबीआयच्या सहसंचालकांनी उपस्थित राहावे, असा आदेश खंडपीठाने दिला. (प्रतिनिधी)जमीन देताना अनावश्यक घाईवाटेगावकर यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी वित्त विभागाने आदर्शबाबत केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून आदर्शला परवानगी दिली. वास्तविक, त्यांना तसा अधिकार नाही. त्यामुळे आदर्शच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या पाटील आयोगाने आदर्शला जमीन देताना निलंगेकर-पाटील यांनी अनावश्यक घाई केली, असे अहवालात म्हटले आहे. पाटील यांनी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून आदर्श सोसायटीमध्ये त्यांच्यासाठी चार सदनिका राखून ठेवण्यात आल्या. त्यांचे जावई अरुण डवळे आणि डवळेंचा चुलत भाऊ संपत खिडसे आणि निलंगेकर पाटील यांना या सदनिका देण्यात आल्या, असा दावा वाटेगावकर यांनी केला आहे.