मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरीभीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे. वाढत्या उष्म्यामुळे एसी, कूलर, फ्रीजचा वापर वाढला आहे. संपूर्ण राज्याला दिवसाला सरासरी १७ हजार ४६४ मेगावॅट वीज लागते. केंद्रीय प्रकल्प, खासगी, महाजनकोच्या प्रकल्पातून दिवसाला सरासरी १९ हजार ०६३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. मागणीनुसार पुरवठा करूनही वीज शिल्लक राहत आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यात मागणी वाढली तरी पुरवठा करण्यास महावितरणला कोणतीही अडचण भासणार नाही.कोयना वीजप्रकल्पात एक हजार ९६० मेगावॅट वीजनिर्मिती होते. सध्या कोयना धरणात २४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. त्यापैकी १५ टीएमसी (पान १ वरून) पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, अशा सूचना ऊर्जा विभागाने केल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी ९ टीएमसी पाणी शिल्लक असून, ३१ मे पर्यंत पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कोयनेच्या प्रकल्प १ व २ मधून ४० मेगावॅट, प्रकल्प ३ मधून १५७ मेगावॅट तर प्रकल्प ४ मधून ५९३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. भविष्यात ही वीजनिर्मिती कमी प्रमाणात होणार आहे. कोयनेखेरीज परळीचा जलविद्युत प्रकल्प जुलैखेरीज बंदच आहे. जलविद्युत प्रकल्पांची क्षमता कमी असली तरी औष्णिक प्रकल्पांनी मात्र महाराष्ट्रातील जनतेला तारले आहे.मुंबई शहरातील बांद्रा ते दहिसरपर्यंत ‘रिलायन्स’ कंपनीकडून तर कुलाबा ते बांद्रापर्यंत ‘बेस्ट ’ अशा दोन खासगी कंपनीकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. मुंबईला दोन ते अडीच हजार मेगावॅट लागणारी वीज खासगी कंपनीकडून पुरविण्यात येते. कांजूरमार्ग व दहिसरपासून पुढे उर्वरित संपूर्ण राज्यात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबईव्यतिरिक्त राज्यातून १७,४६३ मेगावॅट विजेची मागणी करण्यात येत असली तरी औष्णिक प्रकल्पांमुळे महावितरणपुढे सध्या तरी कोणतीही अडचण नाही.केंद्रीय वीज प्रकल्पातून ६,३६३ मेगावॅट, खासगी कंपन्यांकडून ५,५०० मेगावॅट, महाजनकोतर्फे ७,२०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. दररोज एकूण १९,०६३ मेगावॅट विजेचा पुरवठा राज्याला होत आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करूनही १,५०० मेगावॅट वीज शिल्लक राहत आहे. शिवाय उरण (रायगड) येथील गॅस प्रकल्पातून ३९३ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे.राज्यातील विविध औष्णिक प्रकल्पातून निर्मित होणारी वीज (मेगावॅट) मध्ये पुढीलप्रमाणे :वीजनिर्मिती प्रकल्पनिर्मितीखापरखेडा११४८कोराडी३३३चंद्रपूर१६४३पारस४७१दीपनगर (भुसावळ)१२०६एकलव्य (नाशिक)५२३ महुदा (नागपूर) ५००
आता प्रत्येक प्रभागांत ४ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: April 20, 2016 11:18 PM