बुलडाणा : महसुल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत बंद च्या पाठोपाठ आपल्या प्रमुख दोन मागण्यासाठी तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने सुध्दा उद्या ५ ऑगस्ट पासून बेमुदत संपाचे शस्त्र उगारले आहे. राज्यातील सर्व तहसिलदार उद्यापासून बेमुदत संपावर जात आहेत.तहसिलदार या पदाचे ग्रेड पे वेतन वाढवून ते ४६00 रुपये करण्यत यावे व सीआरपीसी कलम १५६(३) मध्ये आवश्यक उपाय योजना करण्यात यावे या दोन मागण्यासाठी २८ जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या मागण्यावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आता उद्या ५ जुलै पासून सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महसुल कर्मचार्या बरोबरच आता तहसिलदार सुध्दा संपावर जात असल्याने प्रशासनाचे कामकाज ठप्प होणार आहे.
आता तहसीलदारही संपावर
By admin | Published: August 04, 2014 11:10 PM