ShivSena News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर अनोळखी व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:लावर गोळ्या झाडून घेतल्या, ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड केली. अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती असून दहिसर पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मॉरिस हा आमच्या भागातील ज्ञात गुन्हेगार होता आणि तो सर्व राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. युबीटीमध्येही तो शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही त्याला रोखले. त्यांचा आणि अभिषेक घोसाळकरमध्ये वाद झाला आणि नंतर पॅचअपही झाले. गुरुवारी मॉरिस यांनी त्यांच्या कार्यालयात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्यांच्यात वाद होऊन मोरीस केनीने अभिषेक यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले.