शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

आता मंत्रालयातील बैठकींचेही टाइमटेबल

By admin | Published: November 12, 2016 3:54 AM

राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलावू नये.

मुंबई : राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलावू नये. तसेच क्षेत्रीय स्तरावरील विभागप्रमुखांनीसुद्धा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना सोमवारी बैठकीसाठी बोलावू नये. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारी सर्व अधिकारी उपलब्ध असतील याची खात्री जनतेला देता येईल, असे परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाने काढले.प्रशासकीय विभागांचे सचिव आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकींचे वेळापत्रक या परिपत्रकाद्वारे ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक असते, त्यामुळे त्या दिवशी सर्वसाधारणपणे सर्व आमदार मंत्रालयात असतात. त्यांनी उपस्थित केलेल्या विकास कामांबाबत बैठकी आयोजित कराव्यात. याशिवाय, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांबरोबर बैठकी आयोजित करण्यात याव्यात.शुक्रवार ते रविवार या कालावधीत शक्यतो मंत्रालयात बैठका आयोजित करण्यात येऊ नयेत. म्हणजे या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील कामकाजासंबंधात दौरे आयोजित करता येतील. तसेच मंत्री महोदयांच्या वेळी सर्व अधिकारी उपस्थित राहू शकतील. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्व सचिवांची पाक्षिक बैठक साधारणत: प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्यामुळे दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत शक्यतो सचिव अपेक्षित असलेल्या बैठकी घेऊ नयेत, असे निदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)