शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

आता पर्यटनस्थळी पोलीस दल

By admin | Published: March 10, 2016 3:45 AM

२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

यदु जोशी,  मुंबई२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेल्वे प्रवास आणि हॉटेल निवासाचे एकत्रित असे स्मार्ट तिकीट देण्यात येणार आहे, तर पर्यटन स्थळी सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाची स्थापना करण्यात येणार आहे.विदर्भ, कोकण आणि कोल्हापूर भागातील खाद्यपदार्थ, तसेच मुंबईच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे मार्केटिंग केले जाणार असून, त्यासाठी विविध महोत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन पोलीस हे सुरक्षेशिवाय पर्यटकांना परिसरातील कायदा, रूढी, संस्कृती व आकर्षण याबद्दलची माहिती देतील. स्थानिक रहिवाशांनी पर्यटनस्नेही कसे राहावे, यासाठी प्रशिक्षणही देतील. राज्यातील निवडक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील. किल्ल्यांजवळ किंवा लहान किल्ल्यांना जोडणाऱ्या मार्गावर बलून सफारी सुरू करण्यात येतील. दुर्ग परिक्रमेसह सीप्लेन सेवा देण्यात येणार आहे.वैद्यकीय पर्यटनमहाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन परिषदेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, वैद्यकीय पर्यटनाचे प्रकल्प सुरू करण्यात येतील.विविध पॅथींद्वारे उपचाराची केंद्रे उभारणे, वेलनेस अँड स्पा, विपश्यना, ध्यानधारणा आदींचे प्रकल्प उभारण्यात येतील. शैक्षणिक पर्यटनमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे पुणे, मुंबई आणि नागपुरात पर्यटनाशी संबंधित अभ्यास व संशोधनाची व्यवस्था निर्माण करेल. जगविख्यात शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी आदान-प्रदानाचे दालन उघडले जाईल. ३० हजार कोटींची गुंतवणूकपर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार असून, २०२५ पर्यंत ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट असेल. त्यातून दहा लाख रोजगार निर्मिती केली जाईल. येत्या पाच वर्षांत पर्यटनविषयक प्रकल्पांची संख्या दुप्पट व दहा वर्षांत तिप्पट केली जाईल. खासगी गुंतवणुकीतून, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पर्यटन स्थळांचा विकास करताना विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यात, ऐषाराम कर, करमणूक कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर व बिगर शेती कर, चैनीच्या वस्तूंवरील कर, मूल्यवर्धित कर आदींमध्ये सवलतींचे पॅकेज दिले जाणार आहे. परवान्यांचे नूतनीकरण दरवर्षीऐवजी पाच वर्षांत एकदाच करावे लागेल. नागपूर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद या तीन विशेष पर्यटन जिल्ह्यांसाठी वेगळे पॅकेज देण्यात आले आहे.