पंकज रोडेकर- ठाणो
वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची वाढती संख्या तसेच अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. या समस्येतून सर्वसामान्यांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेला 3क्क् ट्रॅफिक वॉर्डनची गरज भासत आहे.
कल्याण आणि उल्हासनगरातील यशस्वी प्रयोगानंतर शहर वाहतूक शाखेने ठाणो आणि कल्याण या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मदतीचा हात मागितल्याची माहिती सूत्रंनी दिली. ट्रॅफिक वॉर्डन हे वाहतूक पोलिसांप्रमाणो वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करतात. त्यांना पोलिसांप्रमाणो गणवेश असतो. मात्र, त्यांची नियुक्ती महापालिकेकडून केली जाते. तसेच त्यांच्या वेतनासह आवश्यक साहित्याचा खर्च महापालिक ाच उचलते.
ठाणो आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रत ठाणो, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या चार महापालिका व कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका अशा एकूण 6 स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्द समाविष्ट आहे. त्यानुसार, तेथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी एकूण 16 वाहतूक उपशाखा असून त्यासाठी एकूण 76क् मंजूर मनुष्यबळ आहे. सद्य:स्थितीत 7क्6 मनुष्यबळ हजर आहे. मात्र, ते कमी आहे. त्यातच वाढते नागरीकरण आणि वाहने, अरुंद रस्ते, ठिकठिकाणी सुरू असलेली उड्डाणपुलांची कामे, खराब रस्ते व त्यांची दुरुस्ती तसेच शहरात ये-जा करणा:या बेस्ट, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथील स्थानिक प्राधिकरणांची सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर खाजगी कंपन्या, मोठय़ा नागरी वसाहतींची स्वतंत्र बससेवा, रिक्षा, टॅक्सी आणि महामार्गावरून दिवसरात्र होणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक, शहरातील वाढत्या मॉलच्या संख्येमुळे तसेच तेथील अपु:या पार्किग व्यवस्थेमुळे मुख्य आणि सव्र्हिस रोडवरील अनधिकृत पार्किग या सर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस क्लिष्ट होत आहे.
कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकांनी यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी प्रत्येकी 25 ट्रॅफिक वॉर्डन दिले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही 2क्क् तर कल्याणला आणखी 1क्क् ट्रॅफिक वॉर्डनची गरज असल्याने या दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सणवार लक्षात घेऊन ट्रॅफिक वॉर्डन लवकरात लवकर मिळाल्यास वाहतूककोंडी सोडवण्यास मदत होऊन सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रंनी दिली.
वाहतूककोंडीची ठिकाणो
ठाणो तीनहात नाका, स्टेशन, नौपाडा परिसर, कापूरबावडी सर्कल, कॅडबरी, मीनाताई ठाकरे चौक, ब्रrांड सर्कल, गायमुख, स्टेशन, पोस्ट हाऊस, शिवाजी चौक (कळवा), कल्याणातील दुर्गाडी, शिवाजी चौक, कल्याण स्टेशन, डोंबिवली स्टेशन ही वर्दळीची ठिकाणो