डहाणू/सफाळे : पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्थानकात गाड्यांचा विलंब दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरदारवर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या २ दिवसामध्ये मेगाब्लॉक व वलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाड यामुळे नोकरदारवर्गाचे व परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गाड्या वेळेवर न येण्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच २ दिवसांमध्ये झालेल्या अनियमित रेल्वेमुळे प्रवाशांचे व नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. सकाळी वलसाडहून मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सफाळे रेल्वेस्थानकावर २० मि. रखडल्यामुळे नोकरदार वर्गाला १ दिवसाची रजा टाकावी लागली आहे. (वार्ताहर)
आता सतावले वलसाड फास्टने
By admin | Published: April 27, 2016 4:09 AM